सह्याद्रीतील दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर : डॉ. शरद आपटे

0

रत्नागिरी : वाढते प्रदूषण, तापमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील काही दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशी भीती वनस्पती तज्ज्ञ डॉ. शरद आपटे यांनी व्यक्त केली.

चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या कोकण विभागातील औषधी वनस्पती या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले, या वनस्पतींचे जतन करणे काळाची गरज आहे. पश्चिम घाट अर्थात सह्याद्री हा जगातील सर्वांत जास्त जैवविविधता असलेल्या आठ जागांपैकी एक आहे. इतर दुर्मिळ सजीवांसोबत येथे मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींचा दैनंदिन जीवनात फार मोठा उपयोग होतो. वेगवेगळ्या रोगांवर या वनस्पती अतिशय गुणकारक आहेत. आधुनिक शास्त्र या औषधी वनस्पतीचा उपयोग औषधनिर्मितीसाठी करतात. अन्न, वस्त्र, निवारा, प्राणवायू, सुगंधी द्रव्य, सौंदर्यप्रसाधन आणि वेगवेगळ्या असाध्य रोगांवर या वनस्पती गुणकारक औषध म्हणून वापरल्या जातात, असे सांगत डॉ. आपटे यांनी साधारण ५० औषधी वनस्पतींची माहिती दिली. या दरम्यान १५० औषधी वनस्पतीचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
12:38 PM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here