रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने प्रतिवर्षी घेतल्या जाणाऱ्या अच्युतराव पटवर्धन स्मृती ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे ही स्पर्धा होणार आहे.
ही स्पर्धा चार गटांत घेतली जाणार आहे. प्रवेश नोंदविण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर आहे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे व नोंदणी करावी. स्पर्धकाने भाषणाची लेखी प्रत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयोजकांकडे देणे अनिवार्य आहे. नाव नोंदणी कौस्तुभ पालकर, मानसी चव्हाण, अनन्या धुंदूर यांच्याकडे करावी.
विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोबत शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संदीप कांबळे, योगिनी भागवत या नंबरवर संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्यवाह सुनील वणजू, कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 13/Sep/2023
