ठाणे : १ जून ते दि.11 सप्टेंबर या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 890.4 मिमी असून या खरीप हंगामात दि.11.09.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात 766.0 मिमी (दि.11 सप्टेंबर पर्यंतच्या सरासरीच्या 86%) एवढा पाऊस पडलेला आहे.
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि.11 सप्टेंबर २०२३ अखेर प्रत्यक्षात १41.09 लाख हेक्टर (99 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पूर्ण झालेली आहेत. दि.11 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.72 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.30 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.11 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 15.28 लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.
राज्यामध्ये दि.25 जुलै 2023 ते दि.11 सप्टेंबर 2023 अखेर 613 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 453 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.
खरीप हंगाम २०२३ करीता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यानुसार राज्यात १९ लाख ७२ हजार १८२ क्विंटल (१०२%) बियाणे पुरवठा झालेला आहे.
खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 59.47 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 39.41लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्य:स्थितीत राज्यात 20.06 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी, अशी माहिती कृषी विभगाने दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 13-09-2023
