नवी दिल्ली :आपण ज्यांना मत देऊन संसदेत पाठवतो त्यापैकी किती लोकांना हे देखील माहित नसतं की आपण ज्यांना मत देतोय त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
देशातील 40 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचं समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे 25 टक्के खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद आहे. निवडणूक अधिकार संस्था एडीआरने ही माहिती जाहीर केली आहे. ADR ने दिलेल्या माहितीमध्ये असे ही समोर आले आहे की, लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराच्या मालमत्तेचे सरासरी मूल्य 38.33 कोटी रुपये आहे आणि 53 (सात टक्के) खासदार अब्जाधीश आहेत.असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या 776 जागांपैकी 763 विद्यमान खासदारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. खासदारांनी निवडणूक लढवण्यापूर्वी शपथपत्रात दिलेल्या माहितीतून ही गोष्ट पुढे आली आहे. सध्या लोकसभेची एक आणि राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा अनिर्णित आहेत.३०६ खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तर १९४ खासदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न यासंबधित खटले आहेत. अपहरण आणि महिलांवरील गुन्हे यांचा देखील समावेश आहे.
केरळमधील 29 पैकी 23 खासदारांवर गुन्हे
एडीआरने म्हटले आहे की, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमध्ये केरळमधील 29 पैकी 23 खासदार (79 टक्के), बिहारमधील 56 पैकी 41 खासदार, महाराष्ट्रातील 65 पैकी 37 खासदार (57 टक्के), तेलंगणातील 24 पैकी 13 खासदार (54 टक्के) दिल्लीच्या 10 खासदारांपैकी 5 (50 टक्के) खासदारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले असल्याचे जाहीर केले आहेत.बिहारमधील 56 खासदारांपैकी 28 (५० टक्के), तेलंगणातील 24 खासदारांपैकी 9 (38 टक्के), केरळमधील 29 खासदारांपैकी 10 (34 टक्के), 65 पैकी 22 (34 टक्के) खासदार आहेत.विश्लेषणात म्हटले आहे की 385 पैकी 139 भाजप खासदार (36 टक्के), 81 पैकी 43 काँग्रेस खासदार (53 टक्के), तृणमूल काँग्रेसच्या 36 पैकी 14 खासदार (39 टक्के), 6 पैकी 5 आरजेडी खासदार (83 टक्के). ), आठपैकी 6 सीपीआय(एम) खासदार (75 टक्के), आम आदमी पार्टीचे 11 पैकी 3 खासदार (27 टक्के), वायएसआर काँग्रेस पक्षाचे 31 पैकी 13 खासदार (42 टक्के) आणि आठ पैकी 2 राष्ट्रवादीचे खासदार (३८ टक्के) खासदारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे की, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
98 विरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हा
ADR नुसार, भाजपच्या 385 खासदारांपैकी 98 (25 टक्के), काँग्रेसच्या 81 खासदारांपैकी 26 (32 टक्के), तृणमूल काँग्रेसच्या 36 खासदारांपैकी सात (19 टक्के) खासदार. आरजेडीचे सहा खासदार, सीपीआय(एम)चे 8 पैकी 2 खासदार (25 टक्के), आपचे 11 पैकी 1 खासदार (9 टक्के), 31 पैकी 11 खासदार वायएसआर काँग्रेस पक्षाचे (35 टक्के) ) आणि 8 पैकी 2 खासदार राष्ट्रवादीचे (25 टक्के) खासदारांनी त्यांच्या शपथपत्रात गंभीर गुन्हेगारी प्रकरणे जाहीर केली आहेत.
महिलांवरील गुन्हे
11 विद्यमान खासदारांनी खुनाशी संबंधित खटले घोषित केले आहेत (भारतीय दंड संहिता कलम 302), 32 विद्यमान खासदारांनी खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित खटले (IPC कलम 307) घोषित केले आहेत, तर 21 विद्यमान खासदारांनी महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित खटले घोषित केले आहेत. या 21 खासदारांपैकी चार खासदारांनी बलात्काराशी संबंधित गुन्हे (IPC कलम 376) घोषित केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार ISO 9001:2015 CERTIFIED (RNI NO. MAHMAR/2013/57411) शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर 14:29 13-09-2023