प्रादेशिक मनोरुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा

0

रत्नागिरी : प्रादेशिक मनोरुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कलकुटगी यांनी ‘मानसिक आजार व आत्महत्या’ याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. स्नेहल तोडकर यांनी ‘बाळंतपणानंतर होणारा मानसिक आजार व आत्महत्या’ याविषयी मार्गदर्शन केले. मनोरुग्णालयात रुग्णांनी आले पाहिजे, असे आवाहन डॉ. तोडकर यांनी केले. आत्महत्या करणे हा कायद्याच्या दृष्टीने अजूनही गुन्हा आहे का? कायद्यामध्ये काय तरतूद सांगितली आहे, याविषयी अॅड. अथर्व देसाई यांनी मार्गदर्शन केले. ‘आरोग्यदायी योजना’ याविषयी डॉ. श्रीमती लवेकर यांनी विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविक सानिका कुंभावडेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनघा राजे व अधीक्षकांनी केले. कार्यक्रमाला मेट्रन नम्रता नाचणकर, कृणाल देसाई, कृतिका गावडे, स्वप्निल रामटेके, मंजुषा हर्डीकर, वैष्णवी पवार, गौरी लिमये, सायली चव्हाण यांसह अधीपरिसेविका उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 13/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here