रत्नागिरी : प्रधानमंत्री आयुष्मान भव या योजनेअंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान संपूर्ण जिल्हास्तरावर प्राथमिक आरोग्य तपासणी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
खेड येथे १३ आणि २७ सप्टेंबर, गुहागर येथे १४, २१, २८ सप्टेंबर, चिपळूण येथे २२ व २६ सप्टेंबर, लांजा येथे २९ सप्टेंबर या दिवशी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, कासारवाडी (सावर्डे) यांच्यातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, लांजा, चिपळूण व खेड या चार तालुक्यांत वैद्यकीय पथके सेवा देणार आहेत. यामध्ये फिजिशियन सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्रचिकित्सक, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ अशा वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे.
खेड येथे उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, चिपळूण येथील अर्बन हेल्थ सेंटर वडनाका, गुहागर ग्रामीण रुग्णालय व लांजा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या तपासण्या होणार आहेत. या उपक्रमाचा स्थानिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषद व वालावलकर रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 14-09-2023
