कोळंबे ओझरवाडी येथे गावठी दारूप्रकरणी एकावर गुन्हा

0

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे ओझरवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मंगळवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. करण्यात आली. अरुण सुधाकर नागवेकर (४९, रा. कोळंबे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पूर्णगड पोलिस कर्मचारी अविनाश पोळ यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित हा ओझरवाडी कोळंबे येथील मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या पायवाटेत झाडी झुडपांच्या आडोशाला ३७० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here