Ratnagiri : ‘आयुष्यमान आपल्या दारी’ अंतर्गत 1 लाख 43 हजार 885 कार्ड वाटप

0

रत्नागिरी : आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजतागायत संपुर्ण देशात 25 कोटी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्हयातही 5 लाख 5 हजार 397 पात्र लाभार्थी असून त्यापैकी 1 लाख 43 हजार 885 लाभार्थ्यांना कार्ड वाटप झाले आहे. तरी उर्वरित लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कार्डसाठी लवकारात लवकर ई के व्हायसी प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड आशा वर्कर, खासगी कॉमन सर्विस सेंटर वा ग्राम, पातळीवरील केंद्र चालक (आपले सरकार केंद्र ), स्वतः लाभार्थी. कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड व त्याच बरोबर १२ अंकी ऑनलाईन रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड व आधार कार्डास लिंक असलेला मोबाईल नंबर, स्वतः लाभार्थी, नवीन लग्न झाल्याचे नाव, नविन जन्म झालेल्या शिशूचे नाव घालण्यासाठी अपडेट रेशन कार्ड, विवाह प्रमाणपत्र, प्रधान मंत्री लेटर, जन्म प्रमाणात्र, सरकार प्रमाणे कुटुंब यादी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

ई कार्ड प्रक्रिया-
ऑपरेटनने BIS2.0 प्रणाली मध्ये आधार नंबर/फॅमिली आयडी नंबर/नाव व्दारे पात्र लाभार्थी शोधुन त्यांचे ई के व्हायसी प्रक्रिया पुर्ण करणे. त्या पात्र कुटुंबामधील (नवीन लग्न झाल्याचे नाव, नविन जन्म झालेल्या शिशूचे नाव) लाभार्थ्याचे नाव नसेल तर त्या लाभार्थ्यास त्या कुटुंबामध्ये समाविष्ठ करुन ई के व्हायसी प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे. BIS2.0 मध्ये ऑपरेटर व्दारे (आशा, कॉमन सर्विस सेंटर) लाभार्थ्यांचे ई ने व्हायसी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर शासनाने निवड केलेल्या एजन्सी व्दारे कार्ड प्रिंट करुन तालुका कार्यालयाकडे पाठविले जातील, व ते कार्ड आशा व्दारे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येतील. BIS२.0 मोबाईल अॅप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp
BIS२.0 वेब पोर्टल लिंक
https://beneficiary.nha.gov.in

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here