केरळमध्ये निपाह व्हायरसचे पाच रुग्ण; मिनी लॉकडाऊन जाहीर

0

नवी दिल्ली : केरळमध्ये बुधवारी (13 सप्टेंबर) आणखी एकाला निपाहची (Nipah) लागण झाली आहे. केरळमध्ये आणखी एक निपाहबाधित रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढू लागली आहे.

केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर आली आहे, त्यामुळे केरळमधील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयारकेरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यात पाच निपाह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, राज्य सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 700 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी 77 जणांना उच्च जोखमीच्या श्रेणीत (High Risk Category) ठेवण्यात आलं आहे.निपाह व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनाकेरळमध्ये याआधीही कोझिकोड जिल्ह्यातील दोन रुग्णांचा निपाहमुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण केरळमध्ये निपाह व्हायरसचा फैलाव होण्याचा धोका आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

निपाह व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी केरळ प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. हाय रिस्क कॅटेगरीत ठेवण्यात आलेल्या 77 जणांना घराबाहेर न निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सण आणि कार्यक्रमांवर बंदीयाआधी निपाहमुळे मृत्यू झालेले दोन रुग्ण ज्या रस्त्यावरुन गेले होते, त्या मार्गांची माहिती लोकांना देण्यात आली आहे, जेणेकरून इतर लोकांनी त्या मार्गाचा, त्या रस्त्याचा वापर करू नये. कोझिकोड जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

केरळमध्ये मिनी लॉकडाऊन

कोझिकोड जिल्ह्यातील 9 पंचायतींचे 58 वॉर्ड कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, येथे फक्त आपत्कालीन सेवांना परवानगी आहे. आपत्कालीन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी आहे. केवळ फार्मसी आणि रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. कंटेनमेंट झोनमधून प्रवास करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बस केरळमध्ये थांबवू नये, असे आदेश देण्यात आहे.9 वर्षांच्या मुलाला देखील निपाहची लागणकोझिकोड जिल्ह्यातील 9 वर्षांच्या मुलाला देखील निपाहची लागण झाली आहे. हा मुलगा व्हेंटिलेटरवर असून त्याच्या उपचारासाठी सरकारने ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडीज मागवले आहेत. यावेळी केरळमध्ये पसरलेला निपाह संसर्ग हा बांग्लादेशातून आला आहे. त्याचा संसर्ग दर कमी आहे, परंतु मृत्यूचं प्रमाण जास्त आहे.

केरळमध्ये 2018 मध्येही झाला होता निपाहचा फैलाव

निपाह विषाणूचा संसर्ग माणसामधून माणसात पसरतो. 2018 मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा निपाह संसर्ग पसरला, त्यावेळी निपाहमुळे 18 पैकी 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा निपाहचा संसर्ग पसरल्याने भीतीचं वातावरण आहे, नंतर 2019 आणि 2021 मध्ये देखील केरळमध्ये निपाह रुग्ण आढळले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here