मुंबई :शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत (MLA Disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होत आहे.
ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) सर्व आमदारांना नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अपात्रता प्रकरणाची सुनावणी होत आहे. विधीमंडळातील सुनावणीत अॅड. असीम सरोदे ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. तर शिंदे गटासाठी निहाल ठाकरे बाजू मांडतील. दरम्यान ही सुनावणी कशी होईल हे जाणून घेऊया.
सुनावणी कक्षात कशी असेल सुनावणी?
– सुनावणी ठिकाणी आसन क्रमांक 7 ते 11 दरम्यान सर्व जण बसतील
– वकील आणि वादी प्रतिवादी हे सुनावणी वेळी पुढे येऊन बाजू मांडतील- अनुक्रमणिकानुसार याचिकाकर्त्यांना बोलावलं जाईल
– वकीलामार्फत ज्यांना बाजू मांडायची आहे त्यांना अधिकार पत्र सादर करावे लागेल
– भविष्यातील समन्वयासाठी वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप नंबर द्यावा लागेल जेणेकरुन पुढील माहिती त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पुरवली जाईल
– सुनावणी कक्षात फक्त वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना परवानगी असेल
– इतर कर्मचारी व वकिलांना विनापरवानगी प्रवेश मिळणार नाही
– मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिर डिव्हाईस सायलेंटवर ठेवावेत
– कुणालाही रेकॉर्डिंग करण्यास परवानगी नसेल जर कुणी रेकॉर्डिंग केल्यास कारवाई होईल
– गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल
आतपर्यंत सुनावणीला उपस्थित असलेले दोन्ही गटाचे आमदार