दापोली : मुरूडमध्ये चेजींग रूम जमीनदोस्त, पर्यटकांची गैरसोय

0

दापोली : दापोली येथील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनाचे ठिकाण असलेल्या मुरूड समुद्रकिना-यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या चेजींगरूम पूर्णतः जमिनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

दापोली तालूक्यातील मुरूड हे गाव पर्यटनासाठी विशेष प्रसिध्द आहे अशा या गावातील समुद्र किना-यावर असलेल्या एक महिलांसाठी तर दुसरी पुरूषासाठीच्या अशा दोन्ही चेंजींग रूम पुर्णतः जमिनदोस्त झाल्या आहेत. महिला पुरूषांच्या स्वतंत्र असलेल्या या दोन्ही चेजींग रूममध्ये स्वतंत्र अशाप्रकारची शौचालये, बाथरूम, मुता-या अणि कपडे बदल्यासाठी स्वतंत्र रूम होत्या. समुद्रकिनारी भटकंतीसाठी आलेल्या कोणाही पर्यटकाला फेसाळणारा निळाशार स्चच्छ समुद्र पाहताच पाण्यात पोहण्याचा मोह होतो. पाण्यात उतरण्याचा मोह होत असलेले पर्यटक हे स्थानिक रहीवाशांकडून माहीती घेत काहीजन समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. मात्र समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांचे उतरण्याचे निवासाचे ठिकाण हे समुद्र किनारपट्टीपासून फारच दुर असते. तर काहीजन हे मुरूड बाहेरील हॉटेलमध्ये राहीलेले येथे आलेले असतात. तेव्हा त्यांना अंगावरील ओळया कपडयानींशी ईतरत्र भटकंतीसाठी अथवा आपल्या उतरलेल्या ठिकाणापाशी जाणे गैरसोयीचे होते.

समुद्र किनाऱ्यावरील चेजींगरूमचे महत्व अधिक होते. कारण येथे भटकंतीसाठी आलेल्यांना आपल्या लघूशंका उरकावयाच्या असल्यास या चेजींगरूमचा उपयोग होत होता. आता त्याच चेजींग रूम जमीनदोस्त झाल्याने पर्यटकांची मोठीच गैरसोय होत आहे. पर्यटनातून विकास हे ब्रिद घेवून चालणा-या शासनकत्र्यांनी येथील पर्यटन वाढले पाहीजे यासाठी आणि त्याशिवाय येथे असलेल्या सोयी सुविधांच्या कमतरतेच्या गरजा पर्यटन वाढीच्यादृष्टीने पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष देणे काळाची गरज आहे. मात्र तसे होताना अजिबात दिसत नाही. येथील रस्ते, पाण्याच्या सुविधा, दिशा दर्शक फलक, धोका सांगणारे मराठी, हींदी आणि इंग्रजी भाषेतील नाम फलक, समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा वाॅच टाॅवर आदी विविध समस्या प्राधान्याने सुरू करण्यास शासनकत्र्यांना सोयीस्कररित्या विसर पडला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा पर्यटन वाढीवर होत आहे पर्यटन वाढीवर झालेला परिणाम रोजगार निर्मिती घटण्यास पुरेसा ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here