मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. पहिल्या दोन पर्वांनंतर आता तिसऱ्या पर्वालाही पसंती मिळत आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सेलिब्रिटींबरोबरच अनेक राजकीय नेतेही हजेरी लावतात.
अवधूत त्याच्या खास शैलीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांना बोलतं करतो. या कार्यक्रमाच्या आगामी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.
सुप्रिया सुळे यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’मधील एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळत होतं. आता ‘खुपते तिथे गुप्ते’मधील दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अवधूत गुप्ते सुप्रिया सुळेंना उपमुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. “उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?” असा प्रश्न अवधूत गुप्ते सुप्रिया सुळेंना विचारतो. यावर क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे अजित पवारांचं नाव घेतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 14-09-2023
