कोकणात दाखल होणाऱ्या गणेश भक्तांसाठी कुवे येथे सुविधा केंद्र

0

लांजा : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्त आणि चाकरमान्यांसाठी लांजा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुंबई गोवा महामार्गावर कुवे येथे सुविधा केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावर्षी गणेशोत्सवाला १९ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई पुणे व अन्य शहरात स्थायिक असलेला कोकणी माणूस, गणेश भक्त या उत्सवाच्या निमित्ताने कोकणात दाखल होणार आहे. मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होणाऱ्या या गणेशभक्त आणि चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजाच्या मार्फत मुंबई गोवा महामार्गावर वेरळ, हातखंबा ,पाली, वेरळ आणि राजापूर, कुवे आदी ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत .या सुविधा केंद्राच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी आणि गणेश भक्तांना चहापाणी, बिस्कीट यांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी देखील तैनात करण्यात येणार आहेत.जेणेकरून गणेश भक्तांची आरोग्य तपासणी व अपघात घडला तर तात्काळ मदत करणे सोपे होईल.

दरम्यान लांजा तालुक्यातील कुवे येथील या सुविधा केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भाजपा तालुकाध्यक्ष महेश खामकर ,भाजपा पदाधिकारी हेमंत शेट्ये ,विजय कुरूप, नगरसेवक संजय यादव तसेच अनिकेत पटवर्धन, लांजा तहसीलदार प्रमोद कदम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रमोद भारती आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here