गुहागर तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीचा अमृत महाआवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2022-23 या कालावधीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पंचायत समिती गुहागरच्या आमसभेत आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तालुक्यात वडद ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक प्राप्त केला.यावेळी वडद ग्रा.प.च्या सरपंच कोमल काशिनाथ मुरमुरे, उपसरपंच संदिप धनावडे, ग्रामसेविका कल्याणी करंदेकर यांचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव झाला.
यावेळी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी वडद ग्रामपंचायतीचे कौतुक केले. या कार्यक्रमाला वडद ग्रामपंचायतचे सदस्य भरत मोरे, प्रथमेश पाडेकर, प्रगती टेरवकर, शालिनी मुरमुरे, वैष्णवी साठले, आरोही डाफळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार ISO 9001:2015 CERTIFIED (RNI NO. MAHMAR/2013/57411) शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर 14:28 14-09-2023