पाटपन्हाळे : श्री गणेश चतुर्थी अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपली असून गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी शृंगारतळी बाजारपेठ सजावट साहित्यांनी सजली आहे.
गणेशोत्सवासाठी झालर, कृत्रिम फुले, विविधरंगी छोट्या आकाराचे चेंडू, कापडातील आसन, मखर, गणेशमूर्ती ठेवण्यासाठी असणारी कमान तसेच धूप, अगरबत्ती, कापूर, गुलाल असे साहित्य विक्रीसाठी आले आहे. फळवाले, फुलवाले सुद्धा सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत. गणपती सजावटीसाठी विविध रंगाच्या माळा, हार, मुकुट, मखर, झुरमुळ्या, डिस्को विद्युत दिवे, कृत्रिम फुलांचे तोरण आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. गणपती उत्सवासाठी चार ते पाच कालावधी उरला आहे. नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत
दैनिक रत्नागिरी खबरदार ISO 9001:2015 CERTIFIED (RNI NO. MAHMAR/2013/57411) शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर 14:28 14-09-2023