रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभासाठी ईकेवायसी व बँक आधार संलग्न करणे आवश्यक आहे. जवळच्या आधार सेंटरला भेट देऊन आधार DBT able करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
केंद्र शासनामार्फत 15 वा हप्ता ज्यांचे ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न NPCI Mapping झाले त्यांनाच अदा करणार आहेत.यासाठी गाव पातळीवर दिनांक 01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 रोजी प्रलंबित लाभार्थ्यांची ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आधार सिडिंग ई-केवायसी व Land Seeding झाले असले तरी हप्ता प्राप्त झालेला नाही. ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड सन 2010-2011 मध्ये काढलेला आहे किंवा आधार कार्ड घेऊन 10 ते 12 वर्षाचा कालावधी झाला आज अखेरीस एकदाही आधार अपडेट केलेला नाही त्यांचे आधार DBT unable असल्यामुळे प्राप्त झाला नाही, अशा लाभार्थ्यांनी आधार केंद्रावर जाऊन आपला आधार बायोमेट्रीक करुन घेतल्यास DBT able केल्यास 15 हप्ता मिळू शकतो.
लाभार्थ्यांनी आधार केंद्रावर जाताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड व निवडणून ओळखपत्र आणि आधारला संलग्न मोबाईल नंबर घेऊन जावे आणि आधार DBT able करुन घ्यावे. ज्या शेतक-यांना केंद्राचा हप्ता मिळणार त्यांना राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार ISO 9001:2015 CERTIFIED (RNI NO. MAHMAR/2013/57411) शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर 14:28 14-09-2023