PAK vs SL : पाकिस्तान-श्रीलंका सामन्याआधीच पावसाची हजेरी, मॅच रद्द झाल्यास कुणाला फटका?

0

कोलंबो : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 मधील सामन्यात आज 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना जिंकणारी टीम आशिया कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध भिडेल.

दोन्ही संघांना जिंकून फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात रंगत पाहायला मिळणार आहे. सामन्याला अपेक्षित वेळेप्रमाणे दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र टॉसआधीच पु्न्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे अजून टॉस झालेला नाही. त्यामुळे या सामन्याचाही पावसामुळे विचका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here