लांजा : मंदिरातील दानपेट्या फोडणारा सहा दिवसात गजाआड

0

लांजा : शिपोशी येथील दोन मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला सहा दिवसांत गजाआड करण्यात रत्नागिरी गुन्हा अन्वेषण विभाग व लांजा पोलिसांना यश आले आहे. गुरुनाथ यशवंत तावडे असे या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिपोशी येथील गांगेश्वर व हनुमान मंदिर येथील दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरी गेल्याची घटना दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. गेले सहा दिवस पोलिस चोरट्यांच्या मागावर होते. मंगळवारी रात्री शिपोशी येथील गुरुनाथ तावडे या संशयिताला गुन्हा अन्वेषण विभाग व लांजा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:07 PM 14/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here