मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या ट्रकला टँकरची धडक

0

खेड : मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटेभरणे नाका येथे रस्त्यावर उभ्या ट्रकला मागून वेगाने आलेल्या टँकरची धडक बसली. या अपघातात टैंकर चालक जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी उड्डाणपुलाच्या अलीकडे रस्त्यावर गोव्याच्या दिशेला तोंड करून एका बाजूला थांबलेल्या ट्रकला बुधवारी दि.१३ रोजी पहाटे मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या रसायन भरलेल्या टँकरने मागून येत जोरदार धडक दिली. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात टैंकर चालक (नाव समजू शकले नाही) जखमी झाल्याचे सांगण्यात आले येते. टँकरची ट्रकला पाठीमागून धडक बसल्यामुळे टँकरच्या दर्शनी भागाचे तसेच ट्रकच्या पाठीमागील बाजूचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:21 PM 14/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here