‘आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही’, सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

0

मुंबई : शिवसेनेतील फुटीवर आज विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीस सुरुवात केली आहे. आज शिवसेनेतील दोन्ही गटातील आमदार विधान भवनात दाखल झाले होते, आता या सुनावणीसही पुढील तारीख देण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत यांनी आज युक्तीवाद केला. जवळपास ६४ मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता, या सुनावणीवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केले आहेत.

आमदार नितीन देशमुख म्हणाले, विरोधी गटाकडून आणखी वेळ मागवून घेण्यात आला आहे. हे आता टाईमपास करत आहेत, आमचा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. विरोधक वेळ काढुपणा करत आहेत, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

” सुनावणी घेण्याचा प्रश्नच येत नाही, सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्णय देण्याचे सांगितले आहे, त्यांनी फक्त कोणताही निर्णय द्यावा. आज दोन्ही पक्षकारांकडून मुद्दे मांडण्यात आले, असंही देशमुख म्हणाले.

आज शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत यांनी आज युक्तीवाद केला. जवळपास ६४ मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता. साखरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शिंदे गटाच्या बाजुने एक अर्ज केला आहे. यात सुनिल प्रभूंनी जी याचिका दाखल केली आहे, त्याची कागदपत्रे उपलब्ध करावीत अशी मागणी केली आहे. तर प्रभूंनी सर्व केसेस एकत्र सुनावणीसाठी घ्याव्यात असा अर्ज दिला आहे. यावर अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना त्यांची कागदपत्रे एकमेकांना द्यावीत से आदेश दिले आहेत.

ही कागदपत्रे एक्स्चेंज झाल्यानंतर तारीख दिली जाणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. पहिली सुनावणी प्रभूंनी दाखल केली होती, असे साखरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या बाजुने कामत यांनी बाजू मांडली आहे. एका आठवड्यात लेखी म्हणणे मांडण्यास अध्यक्षांनी सांगितले आहे. १० व्या कलमावर चर्चा झाली. आता केस टू केस म्हणजेच प्रत्येक आमदार ते सुनिल प्रभू अशी २१ लोकांच्या केस सुरु असणार. हे बरेच दिवस चालेल, असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here