रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये पहिल्याच चिल्ड्रन्स प्ले पार्कची उभारणी मिस्त्री हायस्कूलमध्ये करण्यात येत असून, याचा पायाभरणी समारंभ नुकताच झाला. यावेळी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालिमी इम्दादिया कमिटी रत्नागिरी – मुंबईचे संस्थाध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव जाहीर मिस्त्री, संस्थेचे खजिनदार शाळा व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निसार लाला, मिस्त्री हायस्कूलच्या विविध विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभानिमित्ताने इयत्ता ५ वी ते९ वी तील शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. दहावी परीक्षेत सुयश मिळवणाऱ्या सुमैया सय्यद, रियाम सोलकर, मुईजा सोलकर या तिन्ही विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे ८०% व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या टॉप टेन निवड करून त्यांना रोख रक्कम व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. फरहीन अन्सारी हिने जिल्हास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविल्याबद्दल तिला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे शाजिया बुडये यांना त्यांच्या भरीव कामगिरी बद्दल बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य शिपाई दीपक रसाळ यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाजिया बुडये, सुलताना भाटकर, इम्तियाज सिद्दीकी यांनी बहरदार शैलीत केले. शाजिया बुडये यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:31 PM 14/Sep/2023
