आतुरता बाप्पाची..! मूर्तीकारांची गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यासाठी लगबग

0

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. याच, पार्श्वभूमीवर मूर्तीकार बाप्पाच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत.

बाप्पांचे आगमन काही दिवसांवर आलं असून सध्या बाप्पांची मुर्ती साकारणाऱ्या कला केंद्रांमध्ये बाप्पांच्या मुर्त्यांवर शेवटची रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे.

महागाईची झळ यंदा शाडूच्या मातीचे दर आणि वाहतूक तसेच रंगाचे भाव वधारल्याने गणेश मुर्त्यांचेही भाव वाढले आहेत. तरीही बाप्पाच्या मुर्त्यांची मागणी मोठी आहे. तर ग्राहकांच्या मागणीप्रमाणे या मुर्त्यांची प्रतिकृती साकारली जात आहे.

बारीक रंगरंगोटी, डायमंड, आकर्षक कपडे परिधान कपडे परिधान केलेल्या मुर्त्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्यांवर सुबक आणि रेखीव काम करण्याची जबाबदारी ही या कारागिरांवर असते. बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं असून सध्या गणेश चित्र शाळेत अनेक आकर्षक गणेश मूर्ती तयार आहेत. मुर्त्यांवर केलेलं बारीक रेशीम काम हे अनेक भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here