रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची १४ वर्षाखालील निवड चाचणी शुक्रवार दि. १५ सप्टेंबर व शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे होईल.

ज्यांचा मुलांचा जन्म ०१/०९/२००९ नंतर झाला आहे त्याच मुलांना या निवड चाचणीत सहभाग घेता येईल.

शुक्रवार दिनांक १५/९/२०२३ रोजी खेड, दापोली, चिपळूण व मंडणगड या तालुक्यातील मुले निवड चाचणीला सकाळी १०.०० वा. मैदानात हजर रहावे. तसेच रत्नागिरी, देवरूख, लांजा व राजापूर या तालुक्यातील मुलांनी दिनांक १६/९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. निवड चाचणीसाठी मैदानात हजर रहावे.

निवड चाचणीला येताना आधार कार्ड, जन्म दाखला , फोटो, ,आणि सहा महिने रत्नागिरीत जिल्ह्यामध्ये वास्तव्य असल्याचा पुरावा असलेला दाखला घेऊन यावे. निवड चाचणी फी २००/- रुपये राहील. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी या निवड चाचणीला उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, असो. कार्याध्यक्ष बाळू साळवी व सचिव बिपीन बंदरकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 15/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here