जे. के. कंपनीची जागा ही उद्योगासाठीच देणार : मंत्री उदय सामंत

0

रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधीनंतर जे. के. कंपनीच्या फाईल्सची साऊथ आफ्रिकेत होणारी निर्यात बंद झाल्यामुळे त्याचा फटका येथील कंपनीच्या उत्पादनावर झाल्याने ही कंपनी बंद पडली आहे. याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. परंतु या कंपनीची जागा कोणत्याही बिल्डरला दिली जाणार नाही किंवा मॉल होणार नाही तर एखाद्या उद्योगासाठीच दिली जाईल, असे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ना. सामंत म्हणाले, कंपनी बंद होत असताना काम आपल्याकडे आले होते. त्यांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर दोन-तीन वेळा बैठक झाली. त्यांनी कमी वेतनात काम चालू ठेवण्याची तयारी दाखवली होती. परंतु कंपनी व कामगारांमध्ये समझोता होऊन अखेर कंपनी बंद झाली. याठिकाणी १७ एकर जागा आहे. त्याठिकाणी मॉल होणार नाही किंवा बिल्डरलाही ती जागा दिली जाणार नाही. ही जागा विक्री करताना त्यासाठी एमआयडीसीची परवानगी लागणार आहे. एखादा उद्योग आणणाऱ्या कंपनीलाच ही जागा दिली जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. या कंपनीत २०२ कायमस्वरुपी कामगार होते. त्यातील ९६ कामगार हे जुने होते. या सर्वांनी कंपनी प्रशासनाशी बोलणे करूनच पुढील निर्णय घेतले व कंपनी बंद करण्यात आली. परंतु आता काहीजण गैरसमज पसरवत असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 15/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here