शांतीनगर येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

0

रत्नागिरी : शांतीनगर येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना बुधवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वा. घडली आहे. महेश गोविंद झोरे (वय ४२, रा. झोरे चाळ, शेट्ये कंपाऊंड, शांतीनगर, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार, महेश झोरे यांनी राहत्या घराच्या छताच्या लोखंडी बारला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या भावाने त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here