खेड : हॉटेलची रुम बुक करण्याच्या नावाखाली ९० हजारांची फसवणूक

0

खेड : ऑनलाईन हॉटेल बुक करत असताना हॉटेलचा मॅनेजर बोलत असल्याचे भासवत अज्ञाताने विश्वास संपादन करून तब्बल ९० हजार ६२८ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष कुमार हरिभाऊ खंदाडे हे ड्युक्स रिट्रिट रिसॉर्ट लोणावळा या हॉटेलची रुम बुक करण्याकरीता हॉटेलच्या www.dukes retreat resort lonavala या वेबसाईट वरील फोन क्र ९६६८४७६१६४ या नंबरवर फोन करून रुम बुक करत असताना अनोळखी इसम याने मी इक्स रिट्रिट रिसॉर्ट लोणावळा हॉटेल मॅनेजर बोलत आहे. असे फोनद्वारे बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. हॉटेल बुकिंग करिता त्या व्यक्तीन खंदाडे यांना व्हॉट्सअॅप द्वारे पाठविलेल्या बँक खात्यावर दोन वेळा २४ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा अधिक विश्वास संपादन करून हॉटेल बुकींग रजिस्टेशन पावती वरील कोड गुगल पे वरती टाकावयास सांगून खंदाडे यांच्या बँक खात्यातून १९ हजार ७७ रुपये व २३ हजार ५५१ रुपये डेबीट करुन खंदाडे यांची एकूण ९० हजार ६२८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here