संगमेश्वर : अनंत चतुर्दशीमुळे कोंडिवरेत ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय

0

आरवली : अनंत चतुर्दशी असल्याने ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी २९ रोजी) काढण्याचा निर्णय कोंडिवरे येथील मुस्लिम समाजाने घेतला. रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनीतकुमार चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता व मोहल्ला समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला हिंदू आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोंडिवरे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला सरपंच सायली केंबळे, संगमेश्वर पोलिस निरीक्षक सुरेश गावित, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना चौधरी म्हणाले, ईद आणि गणपती सण आनंदात साजरे करा. हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्याचे आवाहन चौधरी यांनी केले. यामुळे ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय कोंडिवरे येथील मुस्लिम समाजाने घेतला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

बैठकीला मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष सुलतान कापडी, कमरुद्दीन सावंत, वाडीप्रमुख रावजी भुवड, विजय खांडेकर, अयुब मुल्ला, एजाज कापडी, अब्दुल्ला कापडी, सुलेमान खान, लियाकत कापडी, संतोष भुवड, सिद्दीक कापडी, सलाम कापडी, अंनत केबळे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शहनाज कापडी, संदीप कदम, फरीदा माद्रे आदी उपस्थित होते. ग्रामसेवक संदीप शेडगे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 15/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here