गणेशोत्सवानिमित्त आणखी चार रेल्वेगाड्यांना वाढीव डबे

0

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त मध्य-कोकण रेल्वेने आणखी चार रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार असून, गणेशोत्सवासाठी जाणान्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी एलटीटी-मंगळुरू-एलटीटी एक्स्प्रेस (१६ फेन्या), गाडी एलटीटी-कुडाळ-एलटीटी एक्स्प्रेस (२४ फेन्या) या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे अधिक जोडण्यात येणार आहेत. गाडी दिवा-चिपळूण-दिवा मेमूला (३६ फेन्या) प्रत्येकी चार डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आठ डब्यांची मेमू आता १२ डब्यांची धावेल. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या दोन्ही गाड्यांच्या २२ फेन्या २२ डब्यांच्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

नव्या संरचनेनुसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्याऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. २० शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटिंग कम लगेज या श्रेणीतील असणार आहेत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 15/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here