लांजा : फ्रेंड सर्कल लांजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेत शिवकन्या ग्रुप कुरूपवाडी आणि मैत्री ग्रुप लांजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
फ्रेंड सर्कल लांजाच्या वतीने आयोजित ही तालुका मर्यादित मंगळागौर स्पर्धा लांजा गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक हा शिवकन्या ग्रुप कुरूपवाडी आणि मैत्री ग्रुप लांजा यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक हा वटवृक्ष ग्रुप आणि फिटनेस ग्रुप लांजा यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक देखील वक्रतुंड ग्रुप लांजा आणि पारंपारिक ग्रुप यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सखी ग्रुप, द्वितीय क्रमांक साई ग्रुप आणि तृतीय क्रमांक साई प्रेरणा ग्रुप यांना देण्यात आला.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट सादरीकरणासाठी चौसूपी ग्रुप, जिजाऊ ग्रुप आणि वनराई ग्रुप वनगुळे यांना देण्यात आला. उत्कृष्ट मुक्तविष्कार यासाठी रॉकिंग वुमन्स 2023, यशस्वी ग्रुप आणि विठ्ठल रुक्मिणी ग्रुप यांना देण्यात आला. खास आकर्षण यासाठी नारीशक्ती ग्रुप, बाजारपेठ महिला मंडळ आणि स्वामी समर्थ लांजा यांना देण्यात आला. तर बेस्ट आऊट लुक चा साठी रणरागिनी ग्रुप( डीजे सामंत) आणि अष्टमी ग्रुप ,वैष्णवी ग्रुप यांना देण्यात आला.
विजय स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात आली .त्याचप्रमाणे अन्य सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 15/Sep/2023
