खेड : जनावरे वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

0

खेड : मुंबई गोवा महामार्गावर भरणे नजीक च्या जगबुडी पुला नजीक बुधवारी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गोविंद मुरलीधर चव्हाण, सचिन मुरलीधर चव्हाण अशी त्या गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

बोलेरो पिकअप गाडी क्र एमएच ११सी एच ११९५ या वाहनाचे परमिटचे उल्लंघण करुन ०५ बैल जातीचे गुरे बोलेरो पिकअप गाडीच्या हौदयामध्ये दाटीवाटीने भरुन कमी जागेत दोरीने बांधुन जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना गैरकायदा कत्तलीसाठी वाहतुक करीत असताना रंगेहाथ मिळुन आले

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल- मध्ये ४ लाख रुपये किंमतीची एक बोलेरो पिकअप गाडी २)५० हजार- रुपये किंमतीचे ५ बैल असा ४ लाख ५० हजारा चा मुद्दे माल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र प्राणी सरक्षण आधि १९९५ चे कलम ५ (अ),(१),९ व प्राण्याना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम
११(ड) (च) व भादवि स कलम ३४, मोटार वाहन कायदा कलम १९८८ चे कलम १९२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 15/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here