इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण

0

नवी दिल्ली – अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात भारताच्या वाटचालीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. 15 ऑगस्ट दिवशी संपूर्ण देश भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होतं. त्याचवेळी इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली. 5 दशकांपासून सुरु असणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन(ISRO) या प्रवासात अनेक महत्वाच्या चाचण्या पूर्ण करण्यास भारताला यश मिळालं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर इस्त्रोनेही विकासाच्या दृष्टीकोनातून मोठा टप्पा पार केला आहे. इस्त्रो हा पहिला प्रकल्प सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन एक्सपेरिमेंट होता. ज्यामधून भारताच्या ग्रामीण भागात टीव्ही पोहचणं शक्य होतं. सध्या इस्त्रो मच्छिमारांसाठी रियल टाइम सॅटेलाइट प्रयोग हाती घेत आहे.
यंदाचं वर्ष इस्त्रोसाठी महत्वपूर्ण यावर्षी इस्त्रोने अनेक महत्वपूर्ण यश मिळविलं आहे. मिशन चांद्रयान 2 ने यशस्वीरित्या अंतराळात झेप घेतलं. मिशन चांद्रयान 2 वर फक्त भारताची नव्हे तर जगभराचं लक्ष लागून राहिलं होतं. हे वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचे आहे कारण यंदा इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. इस्त्रो सुवर्ण महोत्सव साजरा करतंय हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. तसेच इस्त्रोचे संस्थापक आणि भारताच्या अंतरिक्ष विज्ञानाचे जनक असणारे विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. इस्त्रोच्या प्रवासात वेगळेपणा टिकून आहे की, त्यांनी भारतीय अंतरिक्ष विज्ञानात कोणताही प्रयोग करताना प्राधान्य सामान्य माणसांच्या जीवनात सुधारणा करण्यावर दिलं. जेव्हा भारतात अंतरिक्ष विज्ञानात प्रयोग करण्याचा काळ होता त्यावेळी वैज्ञानिकांना आपलं ध्येय स्पष्ट होतं. इस्त्रोच्या कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी वलयाचा अभ्यास आणि संचार सुविधांमध्ये सुधारणा करणे होते. त्यावेळी विक्रम साराभाई यांनी भाषणात म्हटलं होतं की, आम्ही नागरिकांना चंद्रावर पाठविण्याचं स्वप्न बघत नाही, ना कोणत्या विविध ग्रहांचा अभ्यास करणं आमचं ध्येय आहे. भारतीय वैज्ञानिकांची महत्वकांक्षा यशस्वी होणं निराशावादी होणं ही निशाणी नाही तर वैज्ञानिकांनी भारतीय परिस्थिती समजून लक्ष्य गाठण्याचं ध्येय हवं. स्पेस एजेंसीचे सध्याचे चेअरमन के. सिवन यांनी साराभाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सांगितले की, साराभाई यांचे स्वप्न होतं की, अंतरिक्ष विज्ञान आणि विकल्पाचे प्रयोग हे सामान्य नागरिकांचे हित लक्षात ठेऊन केले पाहिजेत. हे वाक्य आजही इस्त्रोसाठी प्रेरणादायक आहे. आमचे सगळे प्रयोग त्याच दृष्टीकोनातून पुढे सुरु आहेत. ज्याचे यश सगळ्यांना आज दिसत आहे. एक काळ असा होता की, इस्त्रोला त्यांच्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागत होतं. आपलं सॅटेलाइटचं निर्माण आणि त्याचे लॉन्चिंग यासाठी इस्त्रोला दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागलं. इस्त्रोने गेल्या 50 वर्षात अनेक प्रगती केली आणि भारत अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात जगातील अन्य देशांना मदत करत आहे. 15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्त्रोने एकाच वेळी 104 सॅटेलाइट लॉन्च केले होते तो विश्वविक्रम भारताच्या नावावर आहे. यातील सर्वाधिक सॅटेलाइट दुसऱ्या देशांचे होते. 


   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here