‘आपण बोलून निघून जायचं, होईल जनतेचं जे व्हायचं…’; कवी सौमित्र यांच्या कवितेनं वेधलं अनेकांचे लक्ष

0

मुंबई : कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम (Kishor Kadam) हे कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवरील भाष्य करतात. किशोर कदम हे चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात.

नुकतीच किशोर कदम यांनी फेसबुकवर त्यांनी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे. त्यांच्या या कवितेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सौमित्र यांची कविता-

आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं आपल्याला काय..आपण बोलुन निघुन जायचं…आपल्याला काय..

केवढी जनता असते समोरआपल्या जीवाला नस्ता घोरसगळेच पक्ष लावतात जोरकोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधाराजिकडे जसा वाहिल वाराघालत राहायच्या येरझाराजातोच निसटुन हातुन पाराहेच लक्षण लक्षात ठेऊनआपण येत जात ऱ्हायचंतहाने सारखं व्याकुळ व्हायचं

जकडे झरा तिथलं प्यायचंआपल्याला काय…आपण पिउन निघुन जायचंआपल्याला काय…

लोकांची पण सहनशक्तीआपण ताणुन बघत नुस्तीलाऊन द्यायची त्यांच्यात कुस्तीकैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्तेआपले कर्ते आपले धर्तेजिधर घुमाव उधर फिरतेत्यांच्या हातात काय उरतेउद्या परवा विचार करूनंतर त्यांना काय द्यायचंआधी बघू काय खायचं

लोकशाहीचंच गाणं गायचंआपल्याला काय..आपण गाउन निघुन जायचंआपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोतचॅनल्स जाहिराती गिळोतन्याय अन्यायाशी पिळोतएफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोतनिकाल लांबणीवरती पडोतनशिबाशी कामं अडोतनको तशा घटना घडोतजे जे हवं ते ते द्यायचंतेवढ्या पुरतं त्राता व्हायचं

कशालाही नाही भ्यायचंआपल्याला काय..वचनं देउन निघुन जायचंआपल्याला काय..

रोज लोकांसमोर यायचंरोज लोकांसमोर जायचंमाईक बंद चालू असोआपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय ..

सौमित्र.

नेटकऱ्यांच्य कमेंट्स

अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन सौमित्र यांच्या या कवितेचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘किशोर,चांगली चपराक दिलीस,हे वास्तव आहे’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,’व्यक्त होण्यासाठी प्रेरणा देताय तुम्ही.. स्वत: व्यक्त होऊन.’

किशोर कदम हे प्रसिद्ध कवी आणि अभिनेते आहेत. त्यांनी जोगवा, फँड्री या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here