राजापूर : स्थानिक भूमीपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल, त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहील, अशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे बारसू सोलगाव, गोवळ पंचकोशीतील स्थानिक भूमिपुत्रांनी उभारलेल्या रिफायनरी प्रकल्प विरोधी लढ्यात शिवसेना स्थानिकांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.
सोलगाव, बारसू गोवळ पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थांच्यावतीने देवाचे गोठणे केरावळे येथे आयोजित हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. आपली जमीन आणि घर वाचविण्यासाठी लढणाऱ्या महिलांवर जर शासन काठ्या चालविणार असेल तर मुख्यमंत्री प्रकल्पासाठी आपलं घर आणि जागा सोडतील का. जर मुख्यमंत्री असे करू शकत नाहीत, तर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपली जागा का सोडावी, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, ‘आता निवडणूका आल्या की काही लोक येतील तुम्हाला भ्रमीत करण्याचा प्रयत्न करतील. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील, पैशाचे आमिष दाखविले जाईल. मात्र त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह सर्व पक्ष प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत कार्यक्रमाला रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, दीपक जोशी उपस्थित होते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 15/Sep/2023
