रत्नागिरी : बेरोजगारांना ‘महास्वयं’ वर नोंदणीचे आवाहन

0

रत्नागिरी : बेरोजगारांना आणि नव्या उद्योजकांना नोकरी आणि व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. होतकरू तरुण आणि युवतींनी महास्वयं संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

प्रत्येक इच्छुक उमेदवाराला रोजगार मिळवून देणे, युवक-युवती, महिला, विद्यार्थी यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, नवनवीन संकल्पनांना जन्म देणाऱ्या ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन आणि चालना देणे, उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून ‘आयटीआय’मधील अभ्यासक्रमांचे आयटीआयचे व आधुनिकीकरण करणे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने महास्वयं संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था उद्योग यामध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४६ हजार १५४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. संकेतस्थळावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर कंपन्या उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 15/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here