दाभोळ : दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दागिन्यांचे पॉलिश केल्यावर दागिन्यांच्या वजनात घट झाल्याचा प्रकार उघड झाला.
गिम्हवणे येथील एका व्यक्तीकडे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दागिन्यांना पॉलिश करून दिले व पैसे घेऊन ती व्यक्ती निघून गेली. त्यानंतर शंका आल्यावर ही व्यक्ती पॉलिश केलेले दागिने घेऊन दापोली येथील समर्थ ज्वेलर्स येथे ते दागिने तपासण्यासाठी घेऊन गेली. या दागिन्यांचे वजन केल्यावर मूळ वजनात लक्षणीय घट झाली असल्याचे लक्षात आले. या संदर्भात समर्थ ज्वेलर्सचे आनंद वैशंपायन यांनी सांगितले, घरी दागिने पॉलिश करून देणारे आल्यास त्यांना दागिने देऊ नका. पॉलिश करण्यासाठी जो द्रव पदार्थ वापरला जातो
त्यात सोने अल्प स्वरूपात (उदा. २/३ ग्रॅम) विरघळवून घेतले जाते. त्यानंतर दागिन्याचे वजन केले असता फरक लक्षात येतो. सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आले असल्याने असे भामटे सक्रिय झाले असून, दागिने पॉलिश करून देतो, असे सांगण्यासाठी आल्यास त्यांना दागिने देऊ नयेत असे आवाहन आनंद वैशंपायन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 15/Sep/2023
