मेक्सिकोच्या संसदेत 1000 वर्षांपूर्वीच्या दोन एलियन्सचे मृतदेह

0

ब्रम्हांडामध्ये (Universe) अनेक रहस्य लपलेली असल्याचं म्हटलं जातं.

पृथ्वी (Earth) प्रमाणे इतरही ग्रह (Planet) आहेत, जिथे जीवन असल्याचा दावा जगभरातील शास्त्रज्ञांकडून फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. इतर ग्रहांवरील लोकांना एलियन (Alien) म्हटलं जातं.

काही दिवसांपूर्वी पेरू देशामध्ये एलियनने हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ एलियनच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. असं असताना आता एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा मेक्सिको देशाने केला आहे.

अमेरिकन देश मेक्सिकोने एलियन्सच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा जगासमोर मांडला आहे. मेक्सिकोने एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा केला आहे. मेक्सिकोने दोन एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही, तर मेक्सिकोने संसदेत दोन्ही एलियन्सचे मृतदेह प्रदर्शनासाठी ठेवले होते.

मेक्सिकोच्या संसदेत 1000 वर्षांपूर्वीच्या दोन एलियन्सचे मृतदेह अमेरिकन देश मेक्सिकोच्या काँग्रेसमध्ये म्हणजेच संसदेत यासाठी अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये मेक्सिको सरकारने एलियनचे मृतदेह सर्वासमोर ठेवले. हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातील हा निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, आतापर्यंत एलियन्सच्या अस्तित्वाचा कोणताही अधिकृत पुरावा सापडला नव्हता. मेक्सिकोचा हा दावा खरा ठरल्यास एलियन्सचं अस्तित्व जगासमोर येणार आहे.

डोक्याचा आकार विचित्र, हाताला तीन बोटं मीडिया रिपोर्टनुसार, यूएफओ तज्ज्ञ जेमी मौसन यांनी या एलियन्सच्या मृतदेहांचं अधिकृतपणे अनावरण केलं. मोक्सिको संसदेत दोन पेट्यांमध्ये दोन शव प्रदर्शनी ठेवण्यात आले. या पेट्यांमध्ये दोन विचित्र शरीरयष्टी असलेले दोन मृतदेह होते. या मतृदेहांचं डोकं विचित्र आकाराचं होतं आणि हाताला तीन बोटे होती. हे मृतदेह ममी स्वरुपात होते. हे एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा यूएफओ तज्ज्ञांनी केला आहे. हे एलियन्सचे ममी 100 वर्षांपूर्वीचे असल्याचं बोललं जात आहे. पेरू देशातील कुज्को येथून हे एलियन्सचे मृतदेह सापडल्याचं सांगण्यात आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here