सिधुदुर्ग : कोकणात सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला असतानाच सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात आंबा कलमांना मोहोर आला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावात किल्लेनिवती भागात हापूस आंबे आल्याचं चित्रं पहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात कोकणात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतं आहे. भर पावसाळ्यात आलेला मोहोर प्रगतशील आंबा बागायतदारांनी टिकवून ठेवल्यास त्यांना त्याचा मोठा फायदा होउ शकतो. त्यासाठी फवारण्या आणि आच्छादन करून मोहोर टिकवून त्यांची फळं बाजारपेठेत आल्यास बागायतदारांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो,असे तिथले शेतकरी सांगत आहेत.
पावसाळ्यात झाडांना आंबे लागल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे, कारण भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास झाडाला लागलेले आंबे झडून जाण्याची किंवा त्याला कीड लागण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग भागात येणारे पर्यटक सु्ध्दा तिथं भेटी देत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्याचे व्हिडीओ काढले आहेत, तर काही लोकांनी त्याचे फोटो सुध्दा काढले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 15-09-2023
