राजापूर : फासकीत अडकलेल्या बिबटयाची वनविभागाकडून सुखरूप सुटका

0

राजापूर : तालुक्यात उपळे-तळेखाजन-प्रिंदावण येथे फासकीत अडकलेल्या बिबटयाला फासकीतुन सुखरूप बाहेर काढत वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. या बिबटयाला वनविभागाच्या वतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. तशी माहीती राजापूर वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सदरचा बिबटया ही बिबटयाची मादी होती व तीचे वय एक ते दीड वर्षे असल्यचाचे वनविभागाने सांगितले. राजापूर तालुक्यातील मौजे उपळे, उपळे-तळे खाजन-प्रिंदावण येथे रस्त्याच्या डाव्या बाजुला फासकीत एक बिबट्या अडकल्याची माहिती उपळेचे रहीवाशी व पंचायत समितीचे माजी सभापती कमलाकर कदम यांनी गुरूवारी सकाळी राजापूर वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता, उपळे-तळे खाजन-प्रिंदावन रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यालगत फासकीत मादी जातीचा बिबट्या अडकल्याचे दिसले. तात्काळ वनविभागाने या बिबटयाला सुखरूप बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न हाती घेतले.

सदर रेस्क्यू परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, लांजा वनपाल दिलीप आरेकर, पाली वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक लांजा सुरज तेली, वनरक्षक कोर्ले श्रीमती श्रावणी पवार, तसेच रेस्क्यू टिमचे दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये, विजय म्हादये आदींनी स्थानिकांच्या सहकार्याने या बिबटयाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here