रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

0

रत्नागिरी : गुरुवारनंतर शुक्रवारही कोरडा घालवत पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस उघडीप दिली. मुंबईसह अन्य भागात पावसाचा जोर वाढत असताना कोकण किनारपट्टी भागात पाऊस गायब झाला आहे. हलक्या सरींचा शिडकावा अधूनमधून होताना उघडीपीने तापमानात वाढ झाली. मात्र, वीकेंडला रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची श्कयत हवामान विभागाने वर्तविली असताना पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात ‘ऑरेंज ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागारत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने किनारी भागात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता बळावली आहे. समुद्र सपाठीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र प्रभावी ठरणार आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यास कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरत्या महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, पावसाच्या उघडीपीने उन्हाचा ताप वाढला आहे. ढगाळ आणि मळभी वातावरणाने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात घामटा निघत आहे तर दुसरीकडे खरीप क्षेत्रात मध्यंतरी झालेल्या पावसाने दिलासा मिळला असताना पुन्हा ताप वाढल्याने आता पिकांनाही पाण्याची तहान सोसवेनाशी झाली आहे. त्यामुळे काही भागात करपा तसेच कीटकांच्या प्रादुर्भावाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोकणात १८ सप्टेंबरपर्यंत पाऊस
रुसलेला पाऊस उद्यापासून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवार १६ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात असणाऱ्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची प्रक्रिया सुरू आहे. १६ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार, दि. १८ सप्टेंबपर्यंत कोकणातील विविध भागात सुरू राहील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवस गणेश चतुर्थीला पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याने गणेश भक्तांना दिलासा मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 16/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here