देवेंद्र फडणवीस यांची वायसीएम रुग्णालयाला भेट

पिंपरी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. दरम्यान, नेते, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टनचा मात्र यावेळी फज्जा उडाल्याचे दिसून आले. महापौर माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप , माजी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके,उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:00 PM 23-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here