रत्नागिरी : नियमापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी वाहतूकदारांविरुद्ध तक्रार नोंदविण्याचे आवाहन रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे.
त्यानुसार कोणत्याही खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिमी भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही. या दरापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी dyrto.08-mh@gov.in या ई-मेल आयडीवर अथवा ०२३५२-२२९४४४ या व्हॉटस् अॅप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे व दरपत्रकदेखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 16/Sep/2023
