संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील घरामध्ये चांदी, पितळे, तांब्याची जुनी भांडी चोरणाऱ्या संशयिताला आठ महिन्यानंतर पनवेल येथे संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले.
कडवई येथील अंजूम मोडक यांनी १ जुलैला संगमेश्वर पोलिस ठाण्यात घरामधील तांबे, पितळीची जुनी भांडी अशी सुमारे दहा हजार सहाशे रुपये किमतीची चोरी झाल्याचे संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यामधील संशयित सादिक हसन काझी (वय ४५) हा गेले आठ महिने नजरेआड होता. पोलिस नाईक बरगाले, मनवल यांनी तपास करत संशयिताला कल्याण, उल्हासनगर, खारघर पनवेल परिसरातून शोध घेऊन पकडले. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 16-09-2023
