गुहागर : असोरे येथे कारला अपघात

0

गुहागर : तालुक्यातील असोरे घाटीतील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली तर गाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी रात्री येथे घडली. दोघा जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. अपघातातील गाडी नदीपात्रातून क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहे.

चालक रोहित मोरे, मरीन सर्वेअर सूरज सूर्यवंशी हे दोघे जिंदल कंपनी येथून सायंकाळी निघाले होते. जेवण करून ते असोरे मुंबईकडे निघाले. गुहागर तालुक्यातील असोरे घाटी येथे आले असता चालकाचा (गाडी क्र. एमएच ०२ एफई १५८५) गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी बारा फूट खाली असलेल्या नदी पात्रात दगडावर जाऊन आदळली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. ही घटना असोरे येथील महेंद्र निमकर यांना कळताच त्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्याशी संपर्क साधला.

याचवेळी गुहागरमधील अमिष कदम व राजू सावरकर, विनोद मेस्त्री हे प्रवासादरम्यान त्या ठिकाणी आले. त्याचवेळी तालुकाप्रमुख बाईत हे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, विशाल नेटके, शैलेश दिंडे, पप्पू अचरेकर यांच्यासह पोहोचले. येताना त्यांनी रुग्णवाहिका आणली होती. अपघातग्रस्तांना काळोखातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे प्राथमिक उपचारासाठी व त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले.

दरम्यान, तालुकाप्रमुख बाईत यांनी बुधवारी स्वखचनि आबलोली येथील पटेल यांची क्रेन घेऊन असोरे येथे नदी पात्रात असलेली गाडी काढली. यासाठी सचिन बाईत यांच्यासह दीपक पटेल, चेतन महाडिक, पटेल बंधू आदींनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 16/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here