खेड : अपघातप्रकरणी ट्रेलरच्या चालकाविरोधात गुन्हा

0

खेड : मुंबई – गोवा महामार्गावर १३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भरणे काळकाई मंदिराचे पुढे भरणे ओव्हर ब्रीज येथे झालेल्या ट्रेलर व ट्रक यांच्या अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काशीराम सुभाष गुरामदार (-३६ वर्षे व्यवसाय चालक-मालक रा. पंडित दीनदयाल उपाध्यायनगर जाफ्राबाद सिंदगी ता. जि. गुलबर्मा राज्य कर्नाटक) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक हे भरणे काळकाई मंदिरपुढे भरणे ओव्हर ब्रीजचे मागे एअर कॉम्प्रेसर येत नसल्याने उभा केला होता. त्यांच्या ट्रकला अचानक मागून दुसऱ्या वाहनाची जोराची धडक बसली. आवाज झाल्याने त्यांनी खाली उतरुन खात्री केली असता एक पांढऱ्या रंगाचा ट्रेलर मुंबईकडून गोवाकडे जात असताना त्यांच्या ट्रकला धडकला होता. ट्रेलर चालक नीलेश गुलाबचंद चव्हाण (२७ वर्षे, रा. दयालपूर, आझमगड उत्तर प्रदेश याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 16/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here