चिपळूण : संपूर्ण कोकणामध्ये गणेशोत्सव अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. सध्याच्या महागाईच्या काळात सामान्य जनता महागाईने ग्रासली आहे. वीजबिल भरणा करणे आणि गणपतीसारख्या सणात नागरिकांची आर्थिक गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत नागरिकांचे वीजबिल थकल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांना निवेदन देत केली आहे.
गणेशोत्सवात काही नागरिकांचे वीजबिल थकित राहू शकते. या सर्व बाबींचा विचार करता गणपतीच्या सणात तालुक्यातील नागरिकांना बिल भरण्यासाठी सवलत मिळावी, वीजवाहिनी तोडण्यात येऊ नये, अशी मागणी केली. या वेळी नितीन ठसाळे, मिलिंद कापडी, बाबू साळवी, नीलेश कदम, दशरथ दाभोळकर, मनोज जाधव, सचिन पाटेकर, रियाज खेरटकर, सचिन गमरे, गणेश भुरण, सचिन शिंदे, तन्वीर खेरटकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 16/Sep/2023
