‘फडणवीसांनी महाराष्ट्राला एक नंबरवर आणले, पण…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0

रंगाबाद : आज मंत्रीमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. दरम्यान, या बैठकीच्या आधी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली.

विशेष म्हणजे यावेळी बोलतांनी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात परदेशी गुंतवणूक यासाठी महाराष्ट्र एक नंबरवर होता. मात्र मधल्या काळात मागे पडला. आता पुन्हा तो 1 नंबरवर आणण्याचा प्रयत्न करतोय, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान याचवेळी पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच मध्यवर्ती शहर म्हणून आता औरंगाबाद म्हणायचं नाही, तर संभाजीनगर शहर म्हणायचं. पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिले आहे. 2 हजार 700 कोटी पाणीयोजना दिली. रस्त्यांना 500 कोटी दिले.

आज मंत्रीमंडळ विशेष बैठक होणार असून, मराठवाड्यासाठी याचा फायदा होईल. मराठवाड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली. दुसरा टप्पा ही सुरु झाला पाहिजे.सिंचन प्रकल्प, शेतपिकात बदल, कोल्डस्टोरेज यासारखे अनेक निर्णय आपण घेत आहेत. संताची भुमी असलेल्या ठिकाणी ही आपण प्राधान्य देत आहे. भविष्यात आध्यात्मिक आणि वैवैज्ञानिक महत्व या भुमिला प्राप्त होईल. स्वामी रामानंद तीर्थ यांच दिल्लीत स्मारक असलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले आणि नक्कीचं यावर आपण निर्णय घेऊ. कृषी विद्यापीठांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. कृषी संशोधक यांनी शेतकरी यांना मार्गदर्शन केलं पाहिजे.

एनडीआरफचचे नियम डावलून मदत दिली.

पाऊस पडेल आणि कोठा पुर्ण करेल असं वाटतय. पण सरकार आपल्या पाठीशी आहे. आम्ही एनडीआरफचचे नियम डावलून मदत दिली. 1 रुपयात पिक विमा योजना दिली. केंद्र सरकारचे सहा हजार त्याचप्रमाणे राज्य सरकारही सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरण याला ही प्राधान्य दिलं आहे. शासकिय नोकऱ्या दिड लाखांपर्यंत आकडा जाणार आहे. यासाठी मंगल प्रभात लोढा ही स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे प्रयत्न करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 16-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here