पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी चकमकीत महाराष्ट्रपुत्राला वीरमरण

जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी चकमकीत सीआरपीएफ जवान सुनिल काळे यांना वीरमरण आलं आहे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावचे आहेत. पहाटे ४.३० वाजता झालेल्या चकमकीत सुनिल काळे शहीद झाले. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतीय सैन्याने इतर सुरक्षा यंत्रणांसोबत मिळून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.शहीद सुनिल काळे गेल्या १७ वर्षांपासून देशाच्या सेवेत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची हेड कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शंका असल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू केलं. आणखी दहशतवादी नाहीत याची खात्री झाल्यानंतर ठार केलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here