पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल येथे स्वच्छ्ता पंधरवडा संपन्न..

0

मंडणगड : पणदेरी पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे शासनाच्या वतीने 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2023 हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत प्रशालेत विविध उपक्रम राबविण्यात आले

यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छ्ता शपथ दिन साजरा करण्यात आला, स्टँड परिसर येथे स्वच्छता करून स्वच्छ्ता जाणीव जागृती दीन साजरा करण्यात आला, गावात प्रभातफेरी काढून लोकांना स्वच्छतेचा संदेश देऊन समूदाय पोहोच दिन साजरा करण्यात आला, शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय परिसर स्वच्छ करून स्वच्छता सहभाग दिन साजरा करण्यात आला, स्वच्छ हात धुण्याचे प्रशिक्षण दिल्यावर विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुवून हात धुवा दिन साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून वैयक्तिक स्वच्छता दिन साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..याचे बक्षीस वितरण 15 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आले.विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे

निबंध स्पर्धा निकाल

प्रथम क्रमांक – कुमारी श्रुती दिलीप कोबनाक (इ.8 वी)

द्वितीय क्रमांक- कुमारी सायली प्रवीण शिगवण (9 वी)

तृतीय क्रमांक- कुमार मंथन रामदास जाधव (9 वी)

उत्तेजनार्थ – कुमारी कृती प्रवीण शिगवण (8 वी)

चित्रकला स्पर्धा

प्रथम क्रमांक – कुमारी तन्वी चंद्रकांत शिगवण (8 वी)

द्वितीय क्रमांक – कुमार सुजल नरेश बोर्ले ( 9 वी)

तृतीय क्रमांक – कुमारी चंदना मंगेश सुतार (9 वी)

कुमार रूतिक रमेश पोस्टूरे

उत्तेजनार्थ – कुमार सोहम बबन राळे (8 वी)

अशा प्रकारे अतिशय उत्साहात स्वच्छता पंधरवडा संपन्न करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 16/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here