देवरूख आगाराचे नियोजन कोलमडले; गाड्या, कर्मचारी कमी असतानाही पाठवले मुंबईत

0

देवरूख : गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या सेवेसाठी देवरूख आगारातून मुंबईस फेऱ्या पाठवण्यात आल्या आहेत, मात्र यामुळे शुक्रवारी सकाळपासून ग्रामीण भागातील फेऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.

देवरूख आगाराने १३ फेऱ्या रद्द केल्या असून अनेक फेऱ्या आयत्यावेळी रद्द करण्यात आल्या आहेत. देवरूख- रत्नागिरी मार्गावर अनेक फेऱ्या रद्द केल्याने प्रवासी सकाळपासून ताटकळत थांब्यावर उभे होते. देवरूख डेपोकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, त्यात पुरेशा गाड्या उपलब्ध नाहीत. असे असताना चाकरमान्यांसाठी ग्रामीण नियोजन कोलमडले आहे. अनेक थांब्यांवर प्रवासी असतात, पण गाड्या नाहीत अशी स्थिती आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचू शकले नाहीत.

रत्नागिरीत महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी शुक्रवारी एसटीची वाट बघत उभे होते. आगार व्यवस्थापकांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, ग्रामीण फेऱ्यांचे नियोजन सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 16-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here