गुहागर : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा काजुर्ली नं. २ मानवाडी येथे आजी-आजोबा दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
भविष्यात कुटुंब संस्था मजबूत होण्यासाठी आजी-आजोबा यांचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे काळाची गरज आहे आणि म्हणूनच शाळेत आजी – आजोबा दिवस साजरा करण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले. याच अनुषंगाने काजुर्ली नं. २ मानवाडी शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी आपल्या आजी-आजोबा यांना घेऊन शाळेत आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण केले.
यावेळी नारायण मोहिते यांनी माहिती दिली. कार्यक्रमास काजुर्लीच्या सरपंच रुक्मिणी सुवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सायली रेवाळे, उपाध्यक्ष अंजली कुवारे, सर्व शिक्षक, सर्व समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक दशरथ साळवी, शिक्षक संदेश सावंत, स्वयंसेविका श्रावणी पागडे, आम्रपाली जाधव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 16-09-2023
